दामाजी शुगर म्हणजे माझ्या राजकीय फलश्रुतीचे व्यापक व्यासपीठ - आ. समाधान आवताडे.

दामाजी शुगर म्हणजे माझ्या राजकीय फलश्रुतीचे व्यापक व्यासपीठ - आ. समाधान आवताडे.


प्रतिनिधी :  पंढरपूर

मंगळवेढा तालुक्याच्या सहकार विश्वातील वैभवशाली दालन आणि शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना हे माझ्या राजकीय फलश्रुतीचे खूप मोठे व्यापक व्यासपीठ असल्याचे गौरवोउदगार पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहेत.
  
    पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये घवघवीत यश संपादन करून आमदार पदी निवड झाल्याबद्दल श्री. संत दामाजी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री. संत दामाजी शुगर, श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कामगार संघटना आणि श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये आ. समाधान आवताडे बोलत होते.

     याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, सुरुवातीच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मी येथील जनाधार सोबत घेऊन निवडणूक लढलो पण मला दोन्हीही वेळा अपयश आले. अपयश पदरी पडले म्हणून मी निराशा न बाळगता पुन्हा जोमाने कार्य करीत जनसंपर्क वीण आणखी घट्ट करून विधानसभा पोटनिवडणूकीस सामोरे गेलो आणि माय - बाप जनतेने माझ्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास दाखवून माझ्या गळ्यात आमदारकीची माळ घातली.

  माझ्या सुरवातीच्या राजकीय कालखंडात मी श्री संत दामाजी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. तदनंतर मी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या संस्थांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील जनतेने सेवा करण्याची जबाबदारी दिली. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  माध्यमातून जनसंपर्क वाढवत मी विकासाची विविध धोरणे अवलंबल्यामुळे मला जनतेचा रेटा वाढत गेला आणि या सर्व गोष्टींचे रूपांतर माझ्या आमदारकीत झाले असे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.

  ज्याप्रमाणे आतापर्यंत आमच्या संचालक मंडळांनी दामाजी कारखाना कार्यभार अगदी सुरळीतपणे चालविला अगदी त्याचप्रमाणे मी  आमदारकी कालावधीतही माझ्या राजकीय ताकदीचा वापर करून दामाजी कारखाना अजून जोमाने चालविण्यासाठी प्रयत्नशील असेन असे अभिवचन आ. समाधान आवताडे यांनी दिले.
   यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी प्रास्ताविक करून कारखाना सद्य कार्यपद्धतीचा आढावा उपस्थितांना देत कारखान्याचे चेअरमन आ. समाधान आवताडे यांचे अभिनंदन केले. तसेच कारखाना संचालक राजेंद्र सुरवसे,  अशोक केदार व सोमनाथ वठारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कोरोनाच्या महामारीत मयत झालेल्या विविध मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
  यावेळी व्हा. चेअरमन अंबादास कुलकर्णी, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी शुगर संचालक बाळासाहेब शिंदे, शिवयोग्याप्पा पुजारी, सुरेश भाकरे, भारत निकम, मारुती थोरबोले, भुजंगराव आसबे, राजीव बाबर, सचिन शिवशरण, बसवेश्वर पाटील, डॉ.प्रमोदकुमार म्हमाणे, प्रभारी कार्यालय अधीक्षक दगडू फटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कामगार पतसंस्था चेअरमन विश्वास सावंजी, सचिव भारत मासाळ, खंडू खंदारे, बिभिषण बेदरे, दादा बेदरे, संभाजी कुलकर्णी आदी मान्यवर, विविध खात्याचे आधिकारी, पदाधिकारी,  कामगार वर्ग, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी व आभार इंजिनिअर विभागाचे सोमनाथ वठारे यांनी मानले.